तिरोडा – दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले दास्ताऐवज उपलब्ध करून देण्याचे कॅम्प घेण्याबाबद नियोजन सभा तिरोडा पंचायत समिती च्या सभागृहात आज दि. 21 ऑगस्ट ला सकाळी 10. वाजता डॉ. तानाजी लोखंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जी. पं. गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी तिरोडा यांच्या उपस्थितीतीत पर पडले. दि. 4 सप्टेंबर ला इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात, 8 सप्टेंबर ला परसवाडा, 11 सप्टेंबर ला सुकडी डाक – येथे दिव्यांग कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी या सभेला गटशिक्षणधिकारी स्नेहल रामटेके, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शना नंदागवळी, संजय गांधी निराधार नायब तहसीलदार अजय शकुंतलावर व पं.सं. चे सर्व विस्तार अधिकारी, आंगणवाडी चे सर्व पर्यवेशिका, सर्व आशा परिवर्तक व पंचायत समिती चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.








