तिरोडा – ग्राम मुंडीकोटा येथे दिनांक 29 ऑगस्ट ला ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती अध्यक्षाची निवड करण्यासाठी सभेमध्ये नावे मागवण्यात आली याकरिता दोन पुरुष व दोन महिला असे चार नावे घेण्यात आले त्यामुळे अध्यक्षाची निवड हे गुप्त मतदाना घेण्याच्या सर्वानुमते मंजूर करण्यात आली गुप्त मतदानामध्ये अरुणाबाई दीपक डोंगरे माजी सरपंच यांनी सर्वाधिक मते घेऊन तंटामुक्ती अध्यक्षाची माळ आपल्या गळ्यात घातली.सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी आणि समस्त गावकऱ्यांनी अरुणाबाई चे अभिनंदन केले.






