Home » शिक्षात्मक » शिक्षण » करंट लागून 1 इसमाचा मृत्यु तर 1 इसम व 1 महिला जखमी

करंट लागून 1 इसमाचा मृत्यु तर 1 इसम व 1 महिला जखमी

Share:

 

तिरोडा – तालुक्यातील खोड़गाव येथील रहिवासी धुरन भिवलाल पटले वय 55 वर्षे. व त्याची पत्नी द्वारका धुरन पटले वय 48 वर्षे. हे दोघेही आज 31 ऑगस्ट ला सकाळी 10.30 च्या सुमारास आपल्या स्वतःच्या शेतात गेले होते. शेतातील रोपांचे रानटी प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी तारांमध्ये विद्युतप्रवाह सोडला होता. परंतु दुर्लक्ष झाल्याने ते स्वतःच त्या तारांच्या संपर्कात आले आणि दोघेही गंभीर जखमी झाले.
दरम्यान शेजारच्या शेतात असलेले शिवचरण कंठीलाल पटले वय 42 वर्ष. यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही करंट लागला. यात दुर्दैवाने शिवचरण पटले यांचा जागीच मृत्यू झाला.
धुरन पटले व द्वारका पटले या दोघेही पती पत्नीना उपचारासाठी तिरोडा येथील आधार हॉस्पिटल मध्ये नेले तिथे डॉक्टरांनी त्यां दोघांना तपासले असता द्वारका पटले हिची प्रकुर्ती गंभीर असल्याने तिला गोंदिया येथील खासगी बजाज हॉस्पिटल रुग्णालयात हलविण्यात आले.
शिवचरण यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुली, 1 मुलगा असा आप्त परिवार आहे.
शिवचरण याला पोस्टमॉरटम करिता उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे नेले काही तासांनी बॉडी पोस्ट मॉरटम होऊन खोडगाव येथे शिवचरण च्या घरी आणले शिवचरण चे अंतिम संस्कार ठीक सहा वाजता गावच्या स्मशान भूमिमध्ये होणार आहे
या घटनेने खोड़गाव – बोपेसर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पुढील तपास तिरोडा सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मसराम करीत आहेत.

Leave a Comment