
आपल्या लग्नाबद्दल बोलताना आमिर खान म्हणाला, “मी एक साधी गोष्ट सांगतोय, रीना आणि मी खूप लवकर लग्न केले होते. मी २१ वर्षांचा होतो, तर ती १८-१९ वर्षांची होती. खरे तर, २१ वर्षांचा झाल्यावर तुम्हाला एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. त्यात ३० दिवस जातात. तर, १४ मार्चला मी २१ वर्षांचा झालो. त्यानंतर एक महिन्याचा नोटीस दिली. त्यामुळे, कायदेशीररित्या माझ्यासाठी लग्न करण्याचा पहिला दिवस होता, तो म्हणजे १४ एप्रिल. पण शनिवार-रविवार येत होता. त्यामुळे, रीना आणि माझ्यासाठी कायदेशीररित्या लग्न शक्य असलेला पहिला दिवस १८ एप्रिल होता.”







